ग्रामायण प्रतिष्ठानपाककला स्पर्धेत साक्षी ढोमणे प्रथम विजेती

ग्रामायण प्रतिष्ठान 

नागरिकांना समाज परिवर्तनाशी जोडणारे व्यासपीठ! यांच्या वतीने मिलेट, रानभाजी व भारतीय खाद्य संस्कृती संबंधी विविध स्पर्धा 8 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या. या सर्व स्पर्धांचे पुरस्कार वितरण समारोह आज दि.1 ऑक्टोबर रोजी सरस्वती भवन,रामनगर येथे पार पडला.

 आनंदाची आणि अभिमानाची बाब म्हणजे आपल्या महाविद्यालयाची ug final  विद्यार्थिनी साक्षी ढोमने  हिने 66 स्पर्धकामधून प्रथम क्रमांक पटकावला 💐 रू.1500 रोख व प्रमाणपत्र  🥳

आंतरराष्ट्रीय मिलेट वर्षानिमित्त समाजामध्ये रानभाजी आहार, आरोग्य, पर्यावरण, भारतीय खाद्य संस्कृती याबद्दल जागृती व्हावी याकरिता ग्रामायण प्रतिष्ठानने विविध संस्थांच्या सहकार्याने काही प्रत्यक्ष पाककृती स्पर्धा आणि काही अप्रत्यक्ष लिखाण स्पर्धा यांचे आयोजन केले होते.यामध्ये म्हणी, घोषवाक्य, वाक्प्रचार स्पर्धा यातही साक्षीने सहभाग नोंदवला होता.

या स्पर्धांना लोकांनी मोठा उत्तम प्रतिसाद दिला. यावेळी न्यूट्रिशन सोसायटी ऑफ इंडिया यांनी तयार केलेले महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या रानभाजी स्पर्धेतील रेसिपींचे रानभाजी रेसिपी ई बुक आणि  आहार विषयक ई बुक आहार जागर यांचे प्रकाशन झाले.आपले सन्माननीय प्राचार्य डॉ. काळे सर यांनी कार्यक्रमात सहभागी होऊन प्रोत्साहन दिले आणि सर्वांचा आनंद द्विगुणित केला  🌷

     धन्यवाद सर 🙏

     अभिनंदन साक्षी 👍🌸

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *