भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालय, नागपूर चा अंतिम वर्षाचा 100 टक्के निकाल

आज दिनांक 26/05/2022 रोजी भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालय, नंदनवन, नागपूर येथे अंतिम वर्ष बी ए एम एस विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. हा समारंभ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी 2021 परीक्षेत महाविद्यालयाचा निकाल
100 टक्के लागला या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता. या परिक्षेत प्रथम क्रमांक कोमल निचल, द्वितीय क्रमांक प्रांजली करंडे तसेच तृतिय क्रमांक रुतूजा यावलकर या विद्यार्थ्यांनी पटकावला. या तीनही विद्यार्थ्यांना विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच स्वर्गिय डॉ प्रियंका देशपांडे मॅडम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शल्यतंत्र विषयात सर्वोत्तम गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यां करीता डॉ शरद त्रिपाठी यांनी दर वर्षी रुपये 1100 व भेटवस्तू देण्याचे जाहीर केले. या वर्षी हा मान रुतूजा यावलकर या विद्यार्थीनीस प्राप्त झाला. या कार्यक्रमास बी सी वार आर सी चे सचिव माननीय श्री राजेन्द्र मुळक सर यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. प्राचार्य डॉ युवराज काळे यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ महेन्द्र अग्रवाल, डॉ छाया तनमने, डॉ राजेन्द्र उराडे, डॉ नामदेव दोरखंडे डॉ भावना भलमे डॉ संगिता भागडकर तसेच महाविद्यालयातील शिक्षक वृंदांच्र्या उपस्थितीत हा समारंभ संपन्न झाला. शिक्षकेतर कर्मचारीवर्गाचा या कार्यक्रमात सहभाग होता. यावेळी काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली. या स हतर्व समारंभाचे मंचसंचालन डॉ अविनाश करंभे यांनी उत्तमरीत्या पार पाडले.

Leave a Reply

Your email address will not be published.