गुदगत विकार ,स्थौल्य व मधुमेह  आयुर्वेद जनजागृती अभियान

भाऊसाहेब मुळक आयुर्वेद
महावर्वद्यालय,नंदनर्वन,नागपूर

गुदगत विकार ,स्थौल्य व मधुमेह  आयुर्वेद जनजागृती अभियान

भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालय,नंदनवन,नागपूर

आयुष संचालनालय,महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याद्वारे आयुर्वेद जनजागृती अभियान अंतर्गत आज दि.10/10/2023 रोजी कायचिकित्सा विभाग व शल्य विभाग द्वारे ज्योतिबा माध्यमिक शाळा, हसनबाग ,नागपूर येथे  स्थौल्य व मधुमेह बद्दल  जनजागृती व निवारण तसेच गुदगत विकार बद्दल  जनजागृती व निवारण या विषयावर अभियान राबविण्यात आले . डॉ. तनमने यांनी  स्थौल्य निवारण या विषयावर शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले  तर डॉ. अलनेवार यांनी गुदगत विकार  बद्दल जनजागृती व निवारण या विषयावर शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, या जनजागृती अभियानाला रुग्णालयाच्या उप अधीक्षक डॉ भागडकर, विभागाच्या  विभाग प्रमुख डॉ. तनमने , शल्य विभागाच्या विभागप्रमुख डॉ अलनेवार, निदान विभागप्रमुख डॉ  वाघ, प्रपाठक डॉ. मुडे व डॉ राऊत , डॉ रेवतकर ,पदव्युत्तर विद्यार्थी , व ज्योतिबा माध्यमिक शाळेचे प्राचार्य लांबट सर व तेथील शिक्षक वर्ग व वर्ग 5 ते वर्ग 10  चे विद्यार्थी उपस्थित होते.विद्यार्थ्यांचे वजन व उंची घेऊन BMI  चे मुल्यांकन करण्यात आले, त्यानुसार पुढील निर्देश देण्यात आले. सोबत डॉ धामने RMO ,नेहा सिस्टर, अटेंडंट भारती व किरण उपस्थित होते.या जनजागृती अभियानाला आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ काळे सर यांनी मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *