भाऊसाहेब मुळक आयुर्वेद
महावर्वद्यालय,नंदनर्वन,नागपूर
अँटी रॅ वगंग सप्ताह
भाऊसाहेब मुळक आयुर्वेदमहाविद्यालय,नंदनवन,नागपूर येथे अँटी रॅगिंग दिना निमित्य अँटी रॅगिंग सप्ताह (११ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट) साजरा करण्यात आला. ११ ऑगस्ट ला कार्यक्रमाच्या पहिल्या_दिवशी स्वस्थवृत्त व योग विभागाच्या विभागप्रमुख डॉ रेहपाडे मॅडम यांनी रॅगिंग चे दुष्परिणाम या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. १४ ऑगस्ट ला अँटी रॅगिंग विषयक पोस्टर स्पर्धा, घोषणा स्पर्धा, निंबंध स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धे मध्ये UG व PG अश्या एकूण ३७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, विजेत्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.काळे सर यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. तृतीय बि.ए. एम.एस विद्यार्थी उमाकांत घाटोळे यांनी अँटी रॅगिंग विषयावर आपले मनोगत व्यक्त केले.
१७ ऑगस्ट ला बालरोग विभागाच्या प्रपाठक डॉ.आगरकर यांनी रॅगिंग विषयी कायदा विषयावर व्याख्यान दिले. व तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. काळे सर यांनी विद्यार्थ्यांना उद्बोधन केले. महाविद्यालया तर्फे अँटी रॅगिंग दिवस जागरूकता रॅली बाजूच्या परिसरात काढण्यात आली. कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते व सर्वांनी छान सहकार्य केले. अश्या प्रकारे अँटी रॅगिंग सप्ताह साजरा करण्यात आला.