आज दिनांक 10 जुन 2024 ला भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय येथे नवीन संगणक कक्षाचे उदघाटन करण्यात आले. हे कक्ष उभारण्यात महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी बबलू गडपायले, संजु रोहनकर, अनिल बोदरकर,अभिजीत चौरे यांनी सुट्टीच्या दिवशी सुद्धा प्रचंड मेहनत करून कक्ष निर्माण केला. तसेच संगणक सहाय्यक मध्ये तारणा ढोले,अंकिता खंडार, वैष्णवी गिरडे,शीतल हिंगे यांनी संगणक सेटअप करण्यासाठी मेहनत घेतली.या कक्षाचे उदघाटन शिक्षकेत्तर कर्मचारी श्री.बबलू गडपायले व संजु रोहनकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ काळे सर, सर्व विरिष्ठ व कनिष्ठ प्राध्यापक, अध्यापक व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
- 10 Jun
- 2024