भाऊसाहेब मुळक आयुर्वेद
महावर्वद्यालय,नंदनर्वन,नागपूर
“मेरी माटी मेरा देश”
अमृत कलश यात्रा
दि. 10 ऑक्टोबर २०२३ ला भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालय, नंदनवन, नागपूर, द्रव्यगुण विभागातर्फे राष्ट्रीय सेवा योजना विभागीय कार्यालय, पुणे आदेशित “मेरी माटी मेरा देश” कार्यक्रमांतर्गत अमृत कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अमृत कलश हातात घेऊन यात्रा काढण्यात आली. यात्रेदरम्यान विद्यार्थ्यांना “पंच प्राण शपथ” घेण्यास प्रोत्साहित करण्यात आले आणि विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी पंच प्राण शपथ घेतली.या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. युवराज काळे, द्रव्यगुणविभाग प्रमुख डॉ. नामदेव दोरखंडे, डॉ. प्रविणा डफ, डॉ.अंजली टेकाडे, डॉ. प्रफुल वाडीचर, तसेच द्रव्यगुणविभागातील पी.जी. विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता महाविद्यालयातील सर्व अध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.