भाऊसाहेब मुळक आयुर्वेद रुग्णालय, नंदनवन नागपूर तर्फे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, व्यंकटेश नगर येथे 28 ज्येष्ठ नागरिक नि:शुल्क चिकित्सा शिबीर 2024 रोजी “ज्येष्ठ नागरिक नि:शुल्क चिकित्सा शिबीर” आयोजित करण्यात आले होते. शिबिराच्या अध्यक्ष स्थानी श्री तानाजी वनवे, डॉ. युवराज काळे, प्राचार्य व डॉ. संगीता भागडकर, उप अधिक्षक उपस्थित होते. तसेच कायचिकित्सा विभागप्रमुख डॉ. सी.एस. तनमने, रोगनिदान विभागप्रमुख डॉ. संध्या वाघ, तसेच शल्य विभागप्रमुख डॉ. मीना अलनेवार, पंचकर्म विभागप्रमुख डॉ महेंद्र अग्रवाल उपस्थित होते. चिकित्सा शिबिरामध्ये नि:शुल्क बीपी चेक, वजन तपासणी, शुगर तपासणी, अस्थि घनत्व परीक्षा व ई. सी.जी.परीक्षा कऱण्यात आले. “आहार आणि योग” या विषयावर स्वस्थवृत्त विभागप्रमुख डॉ. माधुरी रेहपाडे यांनी व्याख्यान दिले व योग प्राणायामाचे प्रात्यक्षिक डॉ. ओमप्रकाश गुल्हाने व डॉ. रुपाली भनारे यांनी दिले. उच्च रक्तदाब, तमक श्वास, मधुमेह, स्मृतिभ्रंश या आजारावरील विशेष माहितीपत्रक वितरण करण्यात आले. एकूण ११२ लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला. सहभागी झालेल्या नागरिकांकडून प्रतिक्रिया घेण्यात आल्या. विविध वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी डॉ. श्रीकांत मुडे, डॉ. उमेद राऊत, डॉ अश्विनी नाकाडे, डॉ. रेवती राखुंडे, डॉ. मयूरी शिंगणापुरकर, डॉ. प्रीती चौधरी, डॉ. वंदना धामने उपस्थित होते.
- 27 Sep
- 2024