भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालय येथे ‌दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. दिनांक १२/०९/२०२१ रोजी दुपारी २ वाजता गणेशाची स्थापना मा. प्राचार्या डॉ अलनेवार मॅडम, अधिष्ठाता डॉ मुकुंद दिवे सर यांच्या हस्ते करण्यात आली करण्यात आली. पुढील दहा दिवसांत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन फरीमल लभडे, सोमेश वर्मा, एकता नागपूरे, संजिवनी साबडे आणि संपूर्ण बी एस एम एस अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी, डॉ शरद त्रिपाठी व सर्व अध्यापक वर्गाच्या मार्गदर्शनाखाली केलेलं असून यामध्ये सर्व हाॅस्पीटल व महाविद्यालयीन कर्मचारी वर्गाचा सहभाग आहे.